• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

March 12, 2026
0
12 03 26 2
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई : चंद्रपूर कारागृहात रवानगी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : वडारवाडीमध्ये दहशत माजविणाऱ्या विटकर टोळीतील अजय विटकर याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी याच अजय विटकरचा भाऊ विजय विटकर यालाही पोलीस आयुक्तांनी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध केले होते.

अजय चंद्रकांत विटकर (वय २४, रा. हरिहरेश्वर सोसायटीसमोर, जुनी वडारवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अजय आणि विजय विटकर या विटकर टोळीची वडारवाडी परिसरात दहशत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विजय विटकर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला बुलढाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते.

अजय विटकर याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मागील पाच वर्षांत त्याच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल झाले आहेत. २०२२ मध्ये त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

वडारवाडी परिसरात त्याची दहशत असल्याने तत्कालीन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही तो पुन्हा वडारवाडीमध्ये आल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला वडारवाडीतील पठाण गल्लीत गेल्या वर्षी पकडले होते.

त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे सापडली होती. त्यांच्या दहशतीमुळे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून अजय विटकर याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे, सहायक पोलीस आयुक्त अनिकेत पोटे, अमोल धस, पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी, महिला पोलीस हवालदार जाधव, पोलीस अंमलदार संदीप ठोसर, पालांडे, हवालदार वाघवले, मोमीन, दांगडे, शिर्के, तांदळे, गिरंगे आणि कांबळे यांनी केली.

16 1

Latest Articles

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

March 12, 2026
आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

March 12, 2026
सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

March 12, 2026
बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

March 11, 2026
ग्रामीण पत्रकार संघाकडून आदित्य कानडे यांचा विठ्ठलाच्या मूर्तीने सत्कार

ग्रामीण पत्रकार संघाकडून आदित्य कानडे यांचा विठ्ठलाच्या मूर्तीने सत्कार

March 11, 2026
Load More
Previous Post

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

March 12, 2026
आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

March 12, 2026
सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

March 12, 2026
विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

March 12, 2026
बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

March 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

March 12, 2026
आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

March 12, 2026
सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

March 12, 2026
विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

March 12, 2026
बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

March 11, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

March 12, 2026
आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

March 12, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta