तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर : उपाध्यक्षपदी ॲड. चेतन ढाळे, सचिवपदी ॲड. अनिकेत तायडे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका अधिवक्ता परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी ॲड. विक्रम जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. ही निवड बार्शी तालुका अधिवक्ता परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.
या बैठकीस अधिवक्ता परिषदेचे निरीक्षक व मार्गदर्शक गवई उपस्थित होते. यावेळी तालुका कार्यकारिणीची संपूर्ण निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली. अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद खुपसरे यांनी कार्यकारिणी निवडीचा प्रस्ताव मांडला.
वीन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी ॲड. विक्रम जाधव, उपाध्यक्षपदी ॲड. चेतन ढाळे आणि सचिवपदी ॲड. अनिकेत तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी बार्शी वकील संघाचे वरिष्ठ सदस्य ॲड. प्रदीप आलाट, ॲड. माणिक धारूरकर, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. दिनेश देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. राहुल पाटील, ॲड. सुमंत, ॲड. जगदीश साखरे, ॲड. विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
















