• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

February 19, 2026
0
19 2 26 5 1
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

६०० ते ७०० शेतकऱ्यांचा सहभाग : खवा उद्योग व केळी उत्पादनाला नवी दिशा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

भूम : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रामहारी मंगल कार्यालय’, भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन तसेच केळी पीक परिसंवाद २०२६ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी, खवा उत्पादक व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भूम व वाशी परिसरातील खवा उद्योगाला व्यापक बाजारपेठ मिळावी व जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नामांकित खवा खरेदीदार व स्थानिक उत्पादक एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

यावेळी खव्याची गुणवत्ता टिकवणे, स्वच्छ व हायजिनिक पॅकेजिंग, तसेच ब्रँडिंगवर विशेष भर देण्यात आला. उत्पादकांना थेट व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने भविष्यात दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘केळी पीक परिसंवाद २०२६’ संपन्न झाला. कृषी विद्यापीठातील तसेच केळी पिकातील तज्ज्ञांनी केळीच्या बागांवर येणारा करपा रोग व ‘सीएमव्ही’ रोग नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निर्यातक्षम केळी उत्पादन कसे घ्यावे आणि जागतिक बाजारपेठेत कसे स्थान मिळवावे, याबाबत तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी, भूम रेवैयाह डोंगरे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले की, “भूम तालुक्याची ओळख केवळ दूध उत्पादक तालुका म्हणून न राहता ‘खवा क्लस्टर’ म्हणून निर्माण व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव राजकुमार मोरे, प्रकल्प संचालक आत्मा धाराशिव विष्णू मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी भूम भागवत सरडे, तहसीलदार भूम जयवंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूम अतूल ढवळे यांनी केले.

सूत्रसंचालन हर्षल यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोशनी भामरे यांनी केले. केळी पीक परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोके, प्रताप गाढवे, रवी गवळी, आबासाहेब जाधव व योगेश म्हसे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच खवा खरेदीदार–विक्रेता संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद जोगदंड व भरत दळवे उपस्थित होते. या कार्यक्रमास अंदाजे ६०० ते ७०० शेतकरी उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे विशेष कौतुक केले आहे.

Feb 20263 1

Latest Articles

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
आकुर्डी श्री संघ को 2026 चातुर्मास का सौभाग्य

आकुर्डी श्री संघ को 2026 चातुर्मास का सौभाग्य

February 19, 2026
बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त

सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त

February 19, 2026
Load More
Previous Post

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त

सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त

February 19, 2026
सराईत गुन्हेगाराचा खुनाचा कट पोलिसांनी उधळला

सराईत गुन्हेगाराचा खुनाचा कट पोलिसांनी उधळला

February 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 19, 2026
आकुर्डी श्री संघ को 2026 चातुर्मास का सौभाग्य

आकुर्डी श्री संघ को 2026 चातुर्मास का सौभाग्य

February 19, 2026
बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta