आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर ‘लेझर स्पीड कॅमेरे’

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • March 10, 2026
Spread the love

पुणे : पुणे–मुंबई जुन्या महामार्गावर वडगाव मावळ व लोणावळा येथे अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

महामार्गावर होणारे बहुतांश अपघात वेग आणि वाहनचालकांच्या चुकांमुळे घडतात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे.

जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर लोणावळा व वडगाव मावळ परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप या संस्थांकडून सहकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

लोणावळा व वडगाव मावळ परिसरात तीन ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे दिवसा आणि रात्रीही कार्यान्वित राहतात. कॅमेऱ्यांकडून वाहनांचा अचूक वेग नोंदविला जातो. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा ३२० किलोमीटर प्रति तासापर्यंतचा वेग नोंदविण्याची क्षमता या उपकरणांमध्ये आहे, असे गिल यांनी सांगितले.

अपघातात पादचारी, दुचाकीस्वारांचे मृत्यू
पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे भरधाव मोटार आणि ट्रक चालकांविरुद्ध कारवाईसाठी अशा प्रकारचे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.

विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
वडगाव मावळ व लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र तसेच चित्रीकरण करू शकतात. तसेच हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणारे चालक अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करणे शक्य होणार आहे. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

get_footer();