• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

जय आनंद मंडळाकडून आचार्यश्रींच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे पालन : मोहनलाल मानधना

April 3, 2026
0
3 4 26 5
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाप्रसाद भोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज हे मानवतेची शिकवण देणारे महान संत होते. देशभरातील जैन समाजाचे ते श्रद्धास्थान आहेत. नगरची भूमी त्यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आचार्यश्रींचे संस्कार व शिकवण यांचे तंतोतंत पालन जय आनंद महावीर युवक मंडळ करताना दिसून येते. दरवर्षी होणारा अन्नदानाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दरवर्षी मंडळाचे सदस्य आचार्यश्रींच्या स्मृतीत उत्स्फूर्त रक्तदान करतात, हे सुद्धा अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन उद्योजक मोहनलाल मानधना यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसाद वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी मोहनलाल मानधना बोलत होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, आशाताई डागवाले, माजी महापौर भगवान फुलसोंदर, मनोज लोंढे, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष कुंतीलाल राका, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, अजित गांधी, चेतन गुगळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अन्नदानातून मिळणारे पुण्य हे सर्वात मोठे पुण्य असते. जय आनंद महावीर युवक मंडळाचे सर्व सदस्य राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनी दरवर्षी अन्नदानाचा उपक्रम राबवत आहेत.

आचार्यश्रींची मानवतेची व सेवेची शिकवण मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलात आणत आहे. प्रास्ताविकात शैलेश मुनोत यांनी सांगितले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करणाऱ्या जय आनंद महावीर युवक मंडळाने आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला.

दरवर्षी अनेकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो. मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना अन्नदान उपक्रम राबवताना विशेष आनंद होत आहे. यावर्षीही सर्वांना बुंदी, पुरी-भाजी, मसालेभात असा रुचकर मेन्यू देण्यात आला. याशिवाय शहरातील वंचित, अनाथ व अपंग मुलांच्या विविध संस्थांनाही भोजन पोहोचविण्यात आले.

भोजनावेळी सर्वांसाठी टेबल-खुर्च्यांची तसेच थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच उन्हाळा लक्षात घेऊन कुलरचीही व्यवस्था करण्यात आली. आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी मंडळाकडून दरवर्षी अन्नदान केले जाते; यातून प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते.

“जय आनंद”चा जयघोष, “डाळ-रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ” अशी प्रार्थना करत मंडळाच्या महाप्रसाद भोजनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी मनोज गुंदेचा यांनी आभार मानले.

26 274

Latest Articles

महावीर स्वामींच्या विचाराने नगरच्या महावीर इंटरनॅशनलचे उत्कृष्ट समाजाभिमुख काम : आ. संग्राम जगताप

महावीर स्वामींच्या विचाराने नगरच्या महावीर इंटरनॅशनलचे उत्कृष्ट समाजाभिमुख काम : आ. संग्राम जगताप

April 3, 2026
सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

April 3, 2026
पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

April 3, 2026
सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

April 3, 2026

पुण्यात धुक्याचा कहर; इमारतीही झाल्या अदृश्य!

April 3, 2026
Load More
Previous Post

महावीर स्वामींच्या विचाराने नगरच्या महावीर इंटरनॅशनलचे उत्कृष्ट समाजाभिमुख काम : आ. संग्राम जगताप

Next Post

२ कोटींची फसवणूक केलेल्यांपैकी तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta