• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 17, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणीची मागणी

April 15, 2026
0
18 3 26 2
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

खराडी पोलिसांनी काही तासांत खंडणीखोरांना पकडून व्यावसायिकाची केली सुटका

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : खडी क्रशर प्लांट दाखविण्याच्या बहाण्याने मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना खराडी पोलिसांनी काही तासांत पाठलाग करून पकडले आणि व्यावसायिकाची सुटका केली.

सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता खराडी येथील इराणी कॅफे ते पेरणे फाटा दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांचा ‘आनंद स्काय इन्फोटेक’ या नावाने व्यवसाय आहे.

रेल विकास निगम लिमिटेडच्या वतीने त्यांची कंपनी मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्कचे काम करत आहे. जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान आकुर्डी येथील रेल विकास निगमच्या कार्यालयात त्यांची सागर झुरुंगे यांच्याशी ओळख झाली.

झुरुंगे हा खडी स्टोन क्रशर मालाचा पुरवठा करतो. त्यांच्या कंपनीकडून ४५ दिवसांच्या क्रेडिटवर माल घेतला जात होता आणि त्यानुसार बिल दिले जात होते. सागर झुरुंगे याचे ५० लाख रुपयांचे बिल बाकी होते.

१३ एप्रिल रोजी सकाळी सागर झुरुंगे याने फिर्यादी यांना फोन करून सिव्हिल कन्स्ट्रक्शनसंदर्भात बोलणी करायची आहेत, असे सांगून भेटण्याची वेळ ठरवली. त्यानुसार १४ एप्रिल रोजी ते आपल्या फॉर्च्युनर गाडीसह इराणी कॅफेमध्ये भेटले. त्यांच्यासोबत त्यांचा चालक संतोष विश्वकर्मा हाही होता. झुरुंगे याने क्रशर प्लांट पाहायला जाऊ या असे सांगितले.

यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्यांना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून खराडी जकात नाका येथील क्रशर पॉइंटवर नेले. तेथे झुरुंगे यांच्यासोबत एका कंटेनरमध्ये बसविण्यात आले. त्यांच्यासोबत झुरुंगे याचे आणखी तीन साथीदार आले. त्यावेळी सागर झुरुंगे याने ५० लाख रुपयांची मागणी करून “हे पैसे आजच पाहिजेत,” असे सांगितले.

फिर्यादी यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद करून ठेवण्यात आले. त्यानंतर झुरुंगे याचे आणखी तीन साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना “पैसे देऊन टाका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत दमदाटी केली.

“जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील,” असे सांगून त्यांना कंटेनरमधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा फॉर्च्युनर गाडीत बसवून पुणे-अहिल्यानगर रोडने रांजणगावच्या दिशेने नेण्यात आले.

दरम्यान, झुरुंगे याने गाडी एका नव्या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर उभी केली. तेव्हा दुसरी फोर्ड एंडेवर गाडी तेथे आली. त्या गाडीत फिर्यादी यांना बसवून अज्ञात ठिकाणी नेले जात असताना पेरणे फाटा येथील जयस्तंभाजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून त्यांना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अशी झाली कारवाई
सागर झुरुंगे याने फिर्यादी यांच्या वडिलांना फोन करून “५० लाख रुपये मिळाले नाहीत तर तुमच्या मुलाला सोडणार नाही,” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या वडिलांनी चालकाकडे चौकशी केली असता, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून त्यांना घेऊन गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. खराडी पोलिसांनी तत्काळ हालचाल करून संबंधित फॉर्च्युनर गाडीचा शोध सुरू केला. पुणे-अहिल्यानगर रोडवरील जयस्तंभाजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी फिर्यादी यांना घेऊन जाणारी गाडी आढळून आली. फिर्यादी यांनी पोलिसांना अपहरणाची माहिती दिल्यानंतर गाडीत असलेल्या ५ जणांना अटक करण्यात आली.

12

Latest Articles

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

April 17, 2026
भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

April 16, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 16, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

April 16, 2026
गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

काळभैरवनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटप

April 16, 2026
Load More
Previous Post

स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक

Next Post

घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा भंडाफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

April 17, 2026
भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

April 16, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

April 16, 2026
गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

काळभैरवनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटप

April 16, 2026
‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

पत्नीच्या नाकावर बुक्की मारुन हाड केले फ्रॅक्चर

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

April 17, 2026
भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

April 16, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 16, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

April 16, 2026
गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

काळभैरवनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटप

April 16, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

April 17, 2026
भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

April 16, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta