महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रम व प्रेरणादायी ग्रंथवाटप उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त सातारा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दोनशे शैक्षणिक व महापुरुषांवरील प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली.
सोशल मीडियाच्या प्रभावकाळात वाचनसंस्कृती रुजविण्याची गरज लक्षात घेऊन जाणीव फाऊंडेशनतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विठ्ठल पवार साहेब, पोलीस निरीक्षक राहुल जाधव, सचिन माळी साहेब, समाजसेवक रोहिदासबापू चोरघे, अॅड. प्रशांत साळुंके, कवी-लेखक गोपाळ कांबळे, शाहीर देवराम कांबळे, संदीप काळे, शंकर साळुंखे, गणेश हीवरेकर, श्रीकांत कांबळे, किरण साबळे, ऋतुराज पन्हाळकर, ओंकार डवरी, विनोद शिंदे, विक्रम भोरडे, दीपक तांबट, मयूर तळेकर, मंदार भालेराव, गिरीश भंडलकर, शेखर चिकणे, ओंकार कांबळे, गणेश हंबीर, निरंजन मारणे यांच्यासह अंकुश मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव वांधरे, रवींद्र सोनावणे, करण बोदडे, परशुराम दुपर्गुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
















