सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन : चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : २६-११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना सारसबाग येथे अभिवादन करण्यात आले. पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ८.३० ते ८.४० शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेतली विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक श्री. गोटमवाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आणि सेवा मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.