येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : वसतिगृहाच्या रखवालीतून केले पलायन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लघुशंकेसाठी खोलीबाहेर आलेल्या दोन न्यायबंदींनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले कारागृहामध्ये २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
बाळू शिंदे (वय ४९, तुरुंग अधिकारी, श्रेणी-२, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह येथे दोन न्यायबंदी लघुशंकेसाठी खोलीबाहेर आले. त्यांनी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनरीक्षक डोंगरे पुढील तपास करीत आहेत.
