कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : टोमॅटो व मिरचीच्या बियाणांची केली विक्री
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विक्री करणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. कोरेगाव पार्क येथील सबवे फूड हॉटेल, लेन क्र.६ येथे पोलिसांनी कारवाई केली.
मोहम्मद असीम हिदायत शेख (वय ३७, रा. एउफॉरिया सोसायटी, कोंढवा बु।।, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक पवार (वय ५५, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शिवाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय येथे कार्यरत आहेत. अटक आरोपीने शासनाच्या परवानगीशिवाय नामांकित कंपनीच्या नावाने टोमॅटो व मिरचीचे बोगस बियाणे विक्री करून ४१ हजार ५८० रुपयांना शेतकऱ्यांची फसवणूक केली. कोरेगाव पार्क येथील सबवे फूड हॉटेल, लेन क्र.६ येथे २२ डिसेंबर रोजी कोरेगाव पार्क पोलिसांनी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पुढील तपास करीत आहेत.
