सहकारनगर पोलिसांची कामगिरी – मोबाईलवरील क्लिप पाहून केला सामूहिक बलात्कार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईलमधील व्हिडिओ क्लीपवरुन 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या तिघांनी आपल्या आणखी 2 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच वस्तीत राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी 4 महिन्यांपूर्वी सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार हवेली पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाला आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल भांगरे (वय १९), निलेश नेटके (वय २१,) दोघे रा. डोणजे असे अटक केलेल्या दोघांची नावे असून, एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल २० डिसेंबर रोजी तळजाई पठार येथे गस्त घालत असताना ईश्वर शिंदे (वय 20) हा तेथे संशयितास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता त्यात एक व्हीडिओ क्लीप मिळाली. त्यात दोघे जण एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. शिंदे याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हा व्हिडिओ स्वत: त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, त्यातील दोघे जण व तो मुलगा परिचित असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. मुलाच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिंदे व त्याचे दोन साथीदार कुणाल भांगरे (वय 19), निलेश नेटके (वय 21, रा. डोणजे) यांना अटक केली. हा प्रकार दिवाळीच्या सुमारास घडला होता. घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सहकारनगर पोलिसांनी आरोपींना हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले. हवेली पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या तिघांसह इतर दोघांनी एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन माहिती घेतली असता हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार 2020 ते सप्टेंबर 2021 दरम्यान डोणजे येथील हॉटेल मधुबन समोरील काम बंद पडलेल्या इमारतीत व मराठी शाळेच्या बंद पडलेल्या बाथरुममध्ये घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी 2020 मध्ये आठवीत शिक्षण घेत होती. यावेळी तिच्या शाळेतील 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलांनी तिच्याशी ओळख वाढविली.
यातील एका मुलाने तिला मधुबन हॉटेल समोरील बंद पडलेल्या इमारतीत बोलावले. तेथे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यानंतर मराठी शाळेतील बंद पडलेल्या बाथरुममध्ये तिला बोलावून निलेश नेटके व इतर दोघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेनंतर तीन दिवसांनी ही मुलगी दोघा मुलांशी बोलत असताना तिसऱ्या एकाने त्यांचा व्हिडिओ काढला. आम्हाला सेक्स करायला दे, नाही तर हा व्हिडिओ सर्वांना दाखवितो, असे म्हणून तिला धमकी दिली. तिच्याबरोबर लज्जास्पद कृत्य केले. तिने त्यांना नकार देत ती घरी गेली होती. या प्रकारानंतर आता पोलिसांनी संपर्क साधल्यावर या मुलीने फिर्याद दिली असून हवेली पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
