डॉ. कोहिनकर : रेझिंग डे निमित्त समर्थ पोलीस स्टेशनमध्ये व्याख्यान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळे छंद जोपासावेत, वाचन, ताणतणाव मनात दाबून ठेवू नका, त्यासाठी व्यायाम, योग साधना, वाचन करा, असा सल्ला डॉ. कोहिनकर यांनी दिला.
पोलीस रेझिंग डेनिमित्त समर्थ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कोहिनकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करीत अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे म्हणाले की, डॉ. कोहिनकर यांच्या मनाची मशागत या पुस्तकामुळे वाचकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होत असल्याचा अनुभव सांगितले. यावेळी आरती कुलकर्णी यांनीही त्यांच्या आयुष्यामध्ये मनाची मशागत पुस्तक वाचून सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले.