विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा : धानोरीतील भैरवनगर येथे झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कामगारानेच ८३ लाख २७ हजार ४१० रुपये किमतीच्या दोन किलो ८१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्याने दिली. गुडविल संस्कृती महाराणा प्रताप चौक, धानोरी रोड, भैरवनगर, धानोरी येथे २९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली.
केनाराम चौधरी (वय ४२, रा. धानोरी, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, धानोरीतील महाराणा प्रताप चौक, धानोरी रोड येथे फिर्यादीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ग्राहकांनी ८३ लाख २७ हजार ४१० रुपये किमतीचे दोन किलो ८१ ग्रॅम सोने गहान ठेवलेले सोन्याचे दागिने हिशोबाकरिता घरी नेले, ते कामगाराला माहित होते. त्याच्यावर विश्वास असल्याने त्याच्याकडे घराच्या चाव्या होत्या. कामगारानेच चोरी केल्याची तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत.

















