सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोटारसायकल चोरणाऱ्याच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
मंगेश श्रीधर मुळे, ( वय 27 वर्ष रा. यवती ता. मोहोळ जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नावे आहे.
पोलिसांनी सांगितले की, तेजस अजिनाथ कदम (वय ५४, रा. रोपळे, ता. पंढरपूर) यांची मोटारसायकल रोपळे येथून चोरीला गेल्याची तक्रार होती. त्याअनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असताना पेनूर गावातील स्टँडवर मोटरसायकल चोरीतील संशयित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयावरून ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने आष्टी ता. मोहोळ येथून दोन मोटारसायकली, येवती गावातून १, मार्केटयार्ड पंढरपूर येथून, एक रोपळे, ता. पंढरपूर असे एकूण पाच गाड्या चोरल्याची आरोपीने कबुली दिली. त्याच्याकडून तीन डिलक्स, दोन स्प्लेंडर अशा पाच मोटारसायकलीसह एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, सागर शिंदे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















