हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अज्ञात चोरट्यावर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुकानासमोरील पायऱ्यावर ठेवलेल्या एक लाख २० हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरट्याने चोरून नेली. हडपसरमधील यशदीप शॉपिंग सेंटर येथील श्रीनाथ इलेक्ट्रिक दुकानासमोर ६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
श्रीनाथ घुले (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने दुकानासमोरील पायऱ्यावर दोन पॉलिकॅब कंपनीनेच बॉक्स ठेवले होते. त्या बॉक्समध्ये घरातील फिटिंग करण्यासाठी तांब्याची केबल वायर चार हजार ३२० मीटर लांबीची एकूण एक लाख २० हजार रुपये किमतीची चोरट्याने चोरून नेली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार एस.बी. जाधव पुढील तपास करीत आहेत.
