सहकारनगर पोलिसांत फिर्याद : अरण्येश्वर मंदिर येथील पुलाखाली घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अरण्येश्वर पुलाखालील जागेतून बीएसएनएलची ८९ हजार ९७९ रुपयांची कॉपर केबल चोरीला गेली. ८ जानेवारी २०२२ रोजी रात्री सात ते १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९च्या दरम्यान चोरी झाल्याचे उघडकीस आले.
स्वप्नील माने (वय ४६, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी बीएसएनएल कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. त्यांच्याकडे ग्राहकांना लँडलाईन फोन बंद झाल्याबाबत तक्रारी असल्याने त्यांनी अधिकृत कॉन्ट्रॅक्टरसह लाईनची पाहणी केली, त्यावेळी अरण्येश्वर मंदिराजवळील पुलाखालून बीएसएनएलची ८०० पेअर व १२०० पेअरची पीआयजीएफ कॉपर केबल २६ मीटर लांबीची ८९ हजार ९७९ रुपये किमतीची वायर चोरट्याने कापून चोरून नेली. सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार व्ही. व्ही. गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.
