पुणे सायबर पोलिसांचे टार्गेट : जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पाच कोटी दिल्याची दिली कबुली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणारे एजंटांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.
सायबर पोलीस करणार एजंटांची तपासणी…
पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणी तपासाची चक्र वेगवान केली आहेत. टीईटी परीक्षा प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरु झाली आहे. अभिषेक सावरीकरला पैसे देणाऱ्या एजंटांचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आता एजटांची तपासणी करण्यात येणार आहे.
अभिषेक सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ…
टीईटी परीक्षा प्रकरणी अभिषेक सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीनं 5 कोटी रुपये दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध घेतला जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेचं काम कोणत्या एजन्सीला द्यायचं यावर विद्यापीठाचा निर्णय झालेला नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी एजन्सी निवडली नसल्यानं परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाच्याच एजन्सीनं परिक्षेच काम पाहिलं होतं कदाचित त्याच एजन्सीकडे काम जाण्याची शक्यता आहे. मात्र, एजन्सी लवकर नियुक्त झाली नाही तर मग मात्र फेब्रुवारी – मार्चमधील परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.















