गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गोरक्षस्मृती फाउंडेशन व पुणे शहर टपाल (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने खोपडेनगरमध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड दुरुस्ती, जन्मतारीख दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे आदींसाठी शिबिर घेण्यात आले.
दहा वर्षांखालील मुलींसाठी पालकांद्वारे गोरक्षस्मृती फाउंडेशनतर्फे मोफत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे शिबिर झाले. सुकन्या समृद्धी योजनेसाठी १३४ मुलींची खाती उघडण्यात आली. आधार कार्ड शिबिराचा ३४७ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांनी केले होते.
