बिबवेवाडी पोलिसात फिर्याद : स्वामी विवेकानंद रोडवर घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रोडवर पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती.
सागर औरसंगे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्ता, चैत्रबन वसाहतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. मात्र, फिर्यादी गावी गेल्याने (शुक्रवार, दि. २२ जानेवारी २०२२) तक्रार दिली. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. आदलिंग पुढील तपास करीत आहेत.
