फरासखाना पोलिसांची कामगिरी : आळंदी येथील केळगाव रोड येथे केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात वाहन चोरीतील सराईत चोरट्याच्या फरासखाना पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार रिक्षा जप्त केल्या. ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड येथे केली.
संतोष उर्फ अशोक चंद्रकांत ढेरे (वय-46 सध्या रा. चाकण चौक, गोधळे आळी, केळगाव रोड, आळंदी, पुणे मुळ रा. राशींद ता. कर्जत जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. फरासखाना येथे दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आळंदी येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण व अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन तपास पथकाने आळंदी येथील केळगाव रोड येथे आरोपीचा शोध घेत आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने फरासखाना, लष्कर आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4 रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, मनोज अभंग, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, रिजवान जिनेडी, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे, विशाल साबळे, महावीर वलटे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
