म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : म्हाळुंगे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपीला अटक केली. देहूगाव-येलवाडी रस्त्यावर ३० जानेवारी २०२२ रोजी अपघात झाला होता. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय दिलीप काळे (वय ३०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, देहूगाव-येलवाडी रस्त्याने पायी जाणाऱ्या ३० जानेवारी २०२२ रोजी मुरारी विष्णुपंत कालेकर (वय ६४, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांना अज्ञात चालकाची धडक बसल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालक न थांबता पळून गेला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकल चालकाचे नाव शोधून अटक केली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक अप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गोरक थेऊरकर, संतोष काळे, संतोष वायकर, बाळकृष्ण पाटोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास गोरक थेऊरकर करीत आहेत.
















