विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसह ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान अकरा ते साडेअकराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.
सुमन गमेश वाघमारे (वय २५, रा. कात्रज, कोंढवा, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान पीएमपीने ४ फेब्रुवारी २०२२ रोजी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान प्रवास करीत होते.
गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने फिर्यादीचे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व मुलीच्या पर्समधील रोख पाच हजार रुपये व सोन्याचे पेंडल असा एकूण ४९ हजार रुपयांचा किमती ऐवज चोरून नेला. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक जगताप पुढील तपास करीत आहेत.
