प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी घेतले परिश्रम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : लायन्स, लिओ क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब ऑफ तेजस्विनी व कोठारी लॅबोरेटरीने दर मंगळवारी अल्पदरात मधुमेह रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी केले आहे.
मागील ९० दिवसांतील रक्तातील सरासरी साखरेचे प्रमाण तपासणी (एच बी ए १ सी), उपाशीपोटी आणि जेवणानंतर साखरेचे प्रमाण बघण्याची तपासणी, साखरेमुळे मधुमेही रुग्णांच्या इतर अवयवांवर होणारे परिणाम बघण्यासाठी एकत्र तपासणी (डायबेटिक प्रोफाइल) दर मंगळवारी अल्पदरात उपलब्ध करून दिली आहे.
मधुमेही रुग्णांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शिवाजी नगर व पटेल चौक येथील कोठारी लॅबोरेटरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. यासाठी लायन्स क्लबचे अजित देशमुख, लिओ क्लबचे पवन श्रीश्रीमाळ, लायन्स क्लब ऑफ तेजस्विनीच्या अध्यक्ष शर्वरी फुरडे, प्रकल्प प्रमुख कोठारी परिश्रम घेत आहेत.














