मोहोळ पोलिसांची कामगिरी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोने चोरीतील आरोपींना २४ तासांत मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
जोत्स्ना सूरज कचवाई (रा. इंदिरानगर, व्हीआयपी कॉलेजसमोर, पुणे) आणि नवजीवन विनोद वाणी, रा. खरडा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दोन तोळे सोन्याची चोरी झाल्याच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहोळमधील चंद्रमौळी औद्योगिक वसाहत येथे हॉटेल रानवाराजवळ सापळा रचून अटक केली. आरोपीकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, निलेश देशमुख, पोलीस नाईक अमोल घोळवे, प्रवीण साठे, पोलीस अंमलदार सिद्धनाथ मोरे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मालती देशमुख, पोलीस नाईक अनुसया बंडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
















