पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी (दि.२३ जाने) मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार घडल्याची घटना घडली. या घटनेत १९ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिग्नेश गोरे (वय १९, रा. खडीमशीन, कोंढवा)असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिग्नेश घराजवळ थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जिग्नेशच्या दिशेने गोळी झाडली. गोळी मांडीला चाटून गेल्याने तो जखमी झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पणे गोळीबार झाल्याने या परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. जिग्नेशच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. प्राथमिक माहितीच्या आधारावर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
