पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी येथे असणाऱ्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले.यात जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे. कचरा प्रकल्प असून, या कचरा प्रकल्पाला पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती नागरिकांनी दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या ११ फायर गाड्या पाठवण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग अद्याप देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली जात आहे.
