हडपसर पोलिसांत गुन्हा : तुला मित्र पाहिजे की नको म्हणून केले भांडण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तूला मित्र पाहिजे की नको म्हणून अंगावर धावून जात चाकूने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हांडेवाडीत हांडे लॉन्सच्या पाठीमागे हडपसर येथे १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
स्टीवन डिसोजा (वय २७, रा. हांडेवाडी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मित्र विल्सन फर्नांडिस याच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस राहण्यास आला होता. त्यावेळी फर्नांडिस यांची आई, पत्नी, भाऊ आणि सहकारी एकत्र जेवण करीत होते. यावेळी तूला मित्र पाहिजे की नको असे म्हणून भांडण करीत फिर्यादीचा मामा अंगावर धावून भांडण करीत असताना विल्सन मध्ये पडला. त्यावेळी विल्सनच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम पुढील तपास करीत आहेत.
