आवृत्ती पुणे

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more

…न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर

पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को … Read more

‘आयसीएमआर’च्या नियमांचे पालन करूनच डॉ. अंधारे यांच्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार

शासकीय समितीचा स्पष्ट अहवाल : ‘आयएमए’ डॉ. अंधारे यांच्या पाठीशी बार्शी :पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सुश्रुत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. संजय अंधारे यांनी कोविड साथीच्या आपत्तीकाळातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कोविडग्रस्तांवर उपचार केले आहेत, असा स्पष्ट अहवाल या संदर्भात नियुक्त शासकीय समितीने दिला आहे. डॉ. अंधारे यांच्यासारख्या समर्पित भावनेने … Read more

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी लोणीकंद पोलिसांकडून तासाभरातच अटकेत

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून तासाभरात अटक करण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) हा २४ ऑगस्ट रोजी रात्रौ अकराच्या सुमारास कावडे वस्ती वाघोली येथे माया हॉटेलजवळ मोकळ्या जागेत … Read more

बोल्हाई मंदिरातील दागिनेचोर जेरबंद

समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे घेतला शोध पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेजवळील बोल्हाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट व दागिन्यांची १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोरी झाली होती. समर्थ पोलीस ठाण्यातील तपासपथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. अनिल … Read more

शाहू कॉलनीतील मनपा शाळेतील संगणकाची चोरी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कर्वेनगर, शाहू कॉलनी गल्ली नं.१ मधील शाळेत कोविड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून संगणक चोरून नेला. ही घटना २३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते २४ ऑगस्ट २०२१ च्या दरम्यान आठ दरम्यान घडली. याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये … Read more

कोंढव्यात पतीनं 21 वर्षीय पत्नीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले

लैला-मजनूने पतीला हाताने-दगडाने मारहाण करून केले जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय होता़, त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका 50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर 21 वर्षाची पत्नी जात असल्याचे त्याला आढळून आले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्याचा राग आल्याने लैला-मजनूने पतीला हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. कोंढव्यातील एका सोसायटीसमोर मंगळवारी … Read more

जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारे सराईत अटकेत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठ गुन्हेगारांना शिताफीने घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारऱ्या आठ सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. रविवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समृद्धी लेकशायर सोसायटीसमोर असलेल्या पानटपरीशेजारी जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे येथे पूर्वीच्या भांडणाचा … Read more

कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला मारहाण करणारे तिघे जेरबंद

खराडीतील कोठारी ह्युंदाई शो-रुमसमोर घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शो-रूम मधील कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या राग मनात धरुन शो-रुमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडी येथील कोठारी ह्युंदाई शोरुमच्या गेट समोर सोमवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रशिद अब्बास मुल्ला (वय-57 … Read more

कोंढवा पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पती-पत्नीच्या भांडणाचे पर्यवसन – महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आफरिन उमर शेख (वय-21 रा. नवाझिस पार्क, कोंढवा) … Read more