आवृत्ती पुणे

पेट्रोल पंपावर दरोडाच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

खडक पोलिसांत फिर्याद : शंकरशेठ रोडवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. गणेश मल्लेश रायचूर (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, कात्रज), सादिक फिरोज खान (वय … Read more

घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

लोणीकाळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी वडकी परिसरात बेड्या ठोकल्या. आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.शाहरुख विजय पवार (वय-27), बाज्या विजय पवार (वय-21), देवगुन विजय पवार (वय-19 सर्व रा. … Read more

सोशल मिडियावर व्हीडिओ व्हायरल करणारा अल्पवयीन ताब्यात

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने कापला केक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापून हातात कोयता घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार (दि.14) लोहियानगर येथे करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस … Read more

आईचा विनयभंग करणारा दिवटा जेरबंद

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईने पैसे देण्यास नकार दिल्याने २८ वर्षाच्या दिवट्याने (मुलगा) ५५ वर्षाच्या आईला खाली पाडून तिच्याबरोबर अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील भीमनगरमध्ये ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २८ … Read more

स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : व्हिसासाठीच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन एक कोटींचे काढले कर्ज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्हिसा काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांच्या खोट्या सह्या करुन बँक मॅनेजरनेच इतरांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज काढून एका नागरिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेत … Read more

वारजे येथे जागेच्या वादातून ‘राडा’ करणारा अटकेत

वारजे पोलिसांत फिर्याद : कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाड्याने जागा दिली असता ती बळकावून टोळक्याच्या मदतीने मावस भावाने तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर टोळक्याने घराबाहेर लावलेल्या २ मोटारसायकली, रिक्षा व कारची तोडफोड करुन दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सागर दगडु बराटे … Read more

वाटसरूंना लुटणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

खडकी पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्यांना, वाटसरूंना अडवून पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी … Read more

खरेदीच्या आमिषाने पावणेतीन लाख रुपयांना गंडा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करून फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओएलएक्स वरून एसी आणि बेड खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका डॉक्टर तरुणाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातला. डॉ. वासव राठोड (वय २४, रा. नॅन्सी लेक होम, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान … Read more

मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : 15 लाख रुपये किमतीचे 70 मोबाईल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांचे जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 70 अँड्रॉइड फोन जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. विकास वाघेरे (वय-22 रा. अशोकनगर, येरवडा), अनिकेत … Read more

शासनाने घालून दिलेल्या निमयांचे पालन करा

रामदास शेळके : शिवजयंतीनिमित्त बार्शी पोलीस स्टेशनमध्ये शिवभक्तांची बैठक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : शिवजयंती उत्साहात साजरी केली पाहिजे. मात्र, त्यामध्ये कोणताही बिभत्सपणा नको आहे. शिवजयंतीनिमित्त ट्रिपल सीट, हॉर्नचा कर्कश्य आवाज करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोना व ओमिक्रोन संपला नाही, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दी करू नका, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन … Read more