आवृत्ती पुणे

वाटसरूंना लुटणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

खडकी पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्यांना, वाटसरूंना अडवून पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी … Read more

खरेदीच्या आमिषाने पावणेतीन लाख रुपयांना गंडा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करून फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओएलएक्स वरून एसी आणि बेड खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका डॉक्टर तरुणाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातला. डॉ. वासव राठोड (वय २४, रा. नॅन्सी लेक होम, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान … Read more

मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : 15 लाख रुपये किमतीचे 70 मोबाईल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांचे जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 70 अँड्रॉइड फोन जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. विकास वाघेरे (वय-22 रा. अशोकनगर, येरवडा), अनिकेत … Read more

शासनाने घालून दिलेल्या निमयांचे पालन करा

रामदास शेळके : शिवजयंतीनिमित्त बार्शी पोलीस स्टेशनमध्ये शिवभक्तांची बैठक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : शिवजयंती उत्साहात साजरी केली पाहिजे. मात्र, त्यामध्ये कोणताही बिभत्सपणा नको आहे. शिवजयंतीनिमित्त ट्रिपल सीट, हॉर्नचा कर्कश्य आवाज करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोना व ओमिक्रोन संपला नाही, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दी करू नका, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन … Read more

विनयभंगप्रकरणी एक अटकेत, तर एकावर गुन्हा

पोलिसांत फिर्याद दाखल : 32 वर्षीय महिलेशी अश्लील भाषा, तर 29 वर्षीय तरूणीचा विनयभंग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे भररस्त्यात पायी जाणार्‍या महिलांना धक्का देऊन त्यांना शुक शुक करणे, अचानक त्यांच्या कंबरेला हात घालून लज्जास्पद वर्तन करण्याचे प्रकार पुणे शहरात सर्रास होऊ लागले आहेत. त्यापैकी काही महिला, तरुणी पुढे येऊन तक्रार करीत असून … Read more

भाजीचा स्टॉल लावण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

कोंढवा पोलिसांत फिर्याद : कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यावर भाजीचा स्टॉल लावण्यावरून जागेच्या वादातून दोघा मायलेकाने एका तरुणावर कोयत्याने व चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीच्या मेनगेटसमोरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडे आठ वाजता घडली.सद्दाम मोईनुद्दीन शेख (वय २४) आणि शायनाबानु मोईनुद्दीन शेख … Read more

बंद फ्लॅट फोडून पावणेपाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीत घरफोडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ससाणेनगरमध्ये फ्लॅट फोडून चार लाख ८५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये १० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन ते ११ फेब्रुवारी सकाळी १०च्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली. अनिलकुमार बेंदालम (वय ४३, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : मांजरी खुर्द वाघेश्वरी दूध डेअरीसमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरची दुचाकीला धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. मांजरी खुर्द वाघेश्वर दूध डेअरीसमोरील रस्त्यावर १३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. जयश्री श्रीकृष्ण कुवर (वय ४५, रा. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : पुणे-नगर रस्त्यावर वाघोली चौकात झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. वाघोलीतील वाघेश्वर चौकातील पेट्रोल पंपासमोर पुणे-नगर रस्त्यावर हा अपघात ११ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ईश्वर भगत गेवागन (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणारा अटकेत

वारजे पोलिसांत फिर्याद : दत्तनगर-वारजे येथे रविवारी साडेनऊच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणाऱ्यास अटक केली असून, त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर-वारजे येथे १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. गोपी ऊर्फ विजय परबती साष्टे (वय ४९, रा. दत्तनगर, वारजे, … Read more