आवृत्ती पुणे

पुण्यात बॅडमिंटनपटू काश्मिरा भंडारीचा दुर्दैवी मृत्यू

लक्ष्मीनारायण चौकात घडली घटना : डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे बेतलं जीवावर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करणं पुण्यातील एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना, डाव्या बाजूला आधीपासून एक चारचाकी गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे दुचाकीवरील तरुणीने अचानक ब्रेक दाबला. त्याचवेळी तरुणी ट्रकच्या चाकाखाली पडली. ट्रकच्या … Read more

लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

हडपसर-ग्लायडिंग सेंटरमधील प्रकार : आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल नेला चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या दोघांना लोखंडी हत्यार व स्टम्पने चौघांनी मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. कुशल जितेंद्र माळी (वय२२, रा. हांडेवाडी रोड, सातवनगर, हडपसर, मूळ … Read more

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : २५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याच्या चंदननगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व नऊशे रुपये किंमतीचे तीन काडतुसे जप्त केली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल … Read more

दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना : आत्महत्येचे कारण समजू शकले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर येथील काकडे सिटी येथे शुक्रवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. आदी अमित कर्वे (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे … Read more

वाहतूकच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे

राहुल श्रीरामे : येरवडा येथे देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटलच्या वतीने केली नेत्रतपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियमन करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर प्रदूषण, उष्णता, वाहनांच्या प्रखर लाईट्सचा प्रेशर येत असून, दृष्टीवर परिणाम होतो. मात्र, त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नेत्र शिबिर घेतल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी … Read more

बहिणीने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मिळताच घेतले १.४० कोटींचे कर्ज

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणातील महिलेने पुण्यात फ्लॅट घेतला त्या ठिकाणी भाडेकरु ठेवण्यासाठी तिने पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार दिला. तिने त्याचा वापर करुन या फ्लॅटवर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्याच बहिणीची … Read more

लग्नाच्या आमिषाने नागपूरच्या महिलेवर बलात्कार

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका तरुणाने नागपूरच्या महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पुण्यात बोलावून लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पर्समधील ३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more

टीईटी पेपर गैरव्यवहारातील आणखी दोन शासकीय कर्मचारी जेरबंद

नाशिकमधून घेतले ताब्यात : न्यायालयाने सुनावली ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी पेपर गैरव्यवहारात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी पेपर गैरव्यवहारमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघा मुख्य एजंटांना 350 परीक्षार्थींचे 3 कोटी 85 लाख रुपये देणाऱ्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी … Read more

अटकेतील सुपेसह ५ आरोपी, पोलीस उपायुक्त, ११ अधिकारी कोरोनाबाधित

टीईटी आणि शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार : राजकीय आणि सिनेमा क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांसह राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहे. राजकीय क्षेत्रात, सिनेक्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातच आता टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद … Read more

सुमेरु बिल्डकॉन प्रा.लि. च्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : पोलीस अधिकाऱ्याच्या जागेत बिल्डरचे बेकायदा अतिक्रमण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागेमध्ये असलेले कंपाउंड तोडून रस्ता खोदून ऑफिस बांधल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे … Read more