Pune Crime : पुण्याच्या कोंढवातील हुक्का पार्लरवर छापा, मालकासह व्यवस्थापकाविरूद्ध FIR

Pune Crime

Pune Crime : पुण्याच्या कोंढवातील हुक्का पार्लरवर छापा, मालकासह व्यवस्थापकाविरूद्ध FIR

पुणे: कोंढवा परिसरातील हॉटेल क्लब 24 दोराबजी येथे चालणार्‍या हुक्का पार्लरवर सोशल सिक्युरिटी सेलच्या अँटी नारकोटिक्स पथकाने छापा टाकला. (Pune Crime) या कारवाईत 4 चिलम व इतर वस्तूंसह 36,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल सिक्युरिटी सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहमदवाडी येथील हॉटेल क्लब 24 दोराबजी येथे बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळताच स्क्विडने हॉटेलवर छापा टाकला. या दरम्यान हॉटेल मालक अमर खांडेराव (नि-महमदवाडी) आणि मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव (वय 30) हे हुक्का पार्लर चालवताना आढळले.

या प्रकरणी हुक्का बार मालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, डीसीपी श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here