विष्णू कास्टे (Vishnu Kaste) यांच्या मुलाचा शोध फक्त 3 तासात; वाकड पोलिसाची उत्तम कामगिरी.

विष्णू कास्टे (Vishnu Kaste) यांच्या मुलाचा शोध फक्त 3 तासात; वाकड पोलिसाची उत्तम कामगिरी.
पुणे, थेरगाव: विष्णू ज्ञानोबा कास्टे (Vishnu Kaste) यांचा 10 वर्षाचा मुलगा 02 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांच्याकडून वडिलांचा लॅपटॉप बंद पडला, म्हणून त्याने राहते घर कोणाच काही न सांगता सोडून निघून गेला, घरच्यांनी सर्वत्र शोध घेऊन देखील न मिळाल्याने घरच्यांना असा संशय आला की, कोणीतरी अज्ञात इसमाने त्याला आमिष दाखवून त्याला पळवून तर नेले असेल, आशा शंका भासू लागल्या नंतर लगेचच याची तक्रार वाकड पोलीस स्टेशन मध्ये 03 ऑगस्ट रोजी सकळी 10 च्या सुमारास देण्यात आली.
त्यानंतर वाकड पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली, त्यांच्या राहत्या घराजवळील परिसरातील सर्व कॅमेरे चेक करण्यात आले, त्यामध्ये पोलिसांना स्काय फिट जिम जवळील बागेत मुलगा बसलेला निदर्शनास आले, त्या बालकास ताब्यात घेऊन ताच्या (Vishnu Kaste) नातेवाईकना सुखरूप देण्यात आले.
ही कामगिरी फत्ते करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे 1 मधील संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे 2 मधील सुनील टोणपे यांच्या नेतत्वाखाली अशोक जगताप, विजय वेळापूरे, संतोष पाटील, तात्या शिंदे, बाबाजान इनामदार यांनी केली.