तुळजा भवानी क्रीडा संकुल खेळासाठी व जेष्ठ नागरिकांसाठी चालू करा..

तुळजा भवानी क्रीडा संकुल खेळासाठी व जेष्ठ नागरिकांसाठी चालू करा..
परवेज मुल्ला, उस्मानाबाद: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जमावबंदीचे कारण पुढे करत तुळजाभवानी क्रीडा संकुलातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अध्यादेशात याबाबत स्पष्टता नाही शिवाय यवतमाळ, लातूर अशा आणखीन अनेक जिल्हा क्रीडा संकुल खुले आहेत, या धरतीवर किमान सर्वांसाठी तरी सुरू करावे राज्यात कोरोणाचा वाढता प्रभाव यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने नियंत्रणे शासनाने निर्बंध लादले आहेत.
स्थानिक प्रशासनाने या अनुषंगाने आदेश जारी केले मात्र दोन्ही आदेशात क्रीडा प्रशिक्षण केंद्र अथवा मैदाने बंद ठेवणे याबाबत कुठेही स्पष्ट उल्लेख केला नाही असे असतानाही जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडम यांनी मनमानी कारभार करून दिनांक 10-1 2020 पासून जमावबंदीचे कारण पुढे करत क्रीडा संकुल बंद ठेवले आहे.
त्या मुळे संकुलातील 400 मीटर धावणे, अथलेटिक्स मैदान, कुस्ती हॉल, हॉलीबॉल मैदान, बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल मैदान, फुटबॉल मैदान, क्रिकेट, ज्येष्ठ नागरिकांना फिरणे व व्यायाम करण्याकरिता च्या सर्व सुविधा बंद केल्यामुळे नागरिक व खेळाडू असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच आम्ही खेळाडू च्या वतीने कोरोनाचे पालन करून मास्क व सेनी टायझर चा व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सराव करणार याची आम्ही ग्वाही देतो तसेच क्रीडा संकुल लवकरात लवकर चालू न केल्यास नागरिक खेळाडू च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात असून यावेळी मनसेचे दादा कांबळे, विकास पवार, सचिन लोखंडे, श्याम जागीरदार, अनिकेत, गणेश, दिनेश माने, विशाल पवार, राज नागदे आदू उपस्थित होते.