महाराष्ट्र

डिकसळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी हरिभाऊ कुंभार यांची बिनविरोध निवड

डिकसळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी हरिभाऊ कुंभार यांची बिनविरोध निवड

डिकसळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी हरिभाऊ कुंभार यांची बिनविरोध निवड

परवेज मुल्ला, डिकसळ ग्रामपंचायत, कळंब : कळंब तालुक्यातील सर्वात मोठी डिकसळ ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदासाठी सरपंच सौ पुष्पा नानासाहेब धाकतोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हरिभाऊ कुंभार यांची डिकसळच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सौ. पुष्पाताई नानासाहेब धाकतोडे या विजयी झाल्या होत्या. व ऐकून 17 सदस्य पेकी 14 सदस्य निवडून आले होते त्यानंतर मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी हरिभाऊ कुंभार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, कांग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय अंबिरकर यांनी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला .

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, जनक अंबिरकर, प्रदिप गायकवाड, सुर्यकांत कदम, मनिषा संजय अंबिरकर, अंजली महादेव अंबिकर,संगिता लक्ष्मीकांत मुंडे, शोभा प्रकाश मस्के, स्वाती गणेश काळे, जनक गोरोबा जाधव, फातिमा अफसर पठाण, मंगल अंकुश वाघमारे सदस्य उपस्थित होते.

या निवडीवेळी राजाभाऊ बोराडे, वाजेद काझी, शहाजहान शिकलगार, वाजेद काझी, अच्युत जाधव, अतिक पठाण, रामभाऊ जाधव, नानासाहेब धाकतोडे, बलभीम धाकतोडे, कुणाल मस्के, हनुमंत जाधव, सती सुबराव जाधव , गणेश काळे, राहुल कुंभार, मकसूद शिकलगार, राजेश पुरी, संजीत आनंद कुचेकर मस्के, रोहन कुंभार, मनोज गाडे, मुन्ना मस्के, स्वप्नील सावंत, अजित धाकतोडे, चैतन्य कुंभार, सतार शेख अजित मस्के, भीमा हागारे, समाधान गाडे, अभिषेक पवार, अमोल राऊत, छायाताई कुंभार, ज्योती सपाटे, रुकसाना बागवान, सुनंदा भोसले, सौदागर, कुसुम काळे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button