महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
वाशी : वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य सेवा भावी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित गुरुदेव मीडियम इंग्लिश स्कूलच्या सातव्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात दिनांक २ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात टी.व्ही. स्टार सोहेल मुलाणी यांच्या गीतगायनाने आणि रील स्टार प्रशांत तकीक (आप्पा) व पांडुरंग वाघमारे यांच्या कॉमेडीने रंगत आणली.
गेल्या सहा वर्षांपासून गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल, पारगाव यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. सातव्या वर्षीही विविध हिंदी आणि मराठी गाण्यांवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सोहेल मुलाणी यांनी गणरायाच्या गीतगायनाने केली. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्चना डोके यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल खवले यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गावचे उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, पंचायत समिती सदस्या सविता तळेकर, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ कोळी, अंजली मोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. प्रकाश मोटे, शिवसेना (शिंदे गट) तालुका उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सारंग मोटे, वी.वी. कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सिताराम कुलकर्णी, शिवसेना शाखा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बालाजी गिराम, तसेच अशोक जाधव, प्रदीप मोटे, दीपक आखाडे, समाधान मोटे, बाबासाहेब हारे, डॉ. प्रशांत मोटे, सुरेश लाखे, मुजमिल पठाण, सतीश कोठावळे, अॅड. महेश आखाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संस्थेचे अच्युतराव डोके, प्रवीण डोके, राहुल डोके, कल्पना जाधव, मीना मोटे, सुमन डोके, अर्चना डोके, शुभांगी डोके यांनी सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप केले.
कॉमेडीयन रील स्टार प्रशांत तकीक (आप्पा) आणि पांडुरंग वाघमारे यांनी विविध कलाकारांचे हुबेहुब आवाज काढून प्रेक्षकांची दाद मिळवली.
तर सोहेल व साहिल मुलाणी यांच्या हिंदी आणि मराठी गीतगायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. यामध्ये त्यांना आफताब मुलाणी, शुभम सोनवणे, सागर लोंढे, रिया ठाकूर यांची साथ लाभली.
शाळेच्या विद्यार्थ्यांकडून नृत्यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी चव्हाण मॅडम, कोळी मॅडम आणि आखाडे मॅडम यांचे तसेच उपस्थित प्रेक्षक आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार संस्थेच्या वतीने प्रवीण डोके यांनी मानले.
