आवृत्ती , पुणे

पावणेसहा कोटींचे मेफेड्रॉन जप्त

दिल्लीहून आला होता तस्कर : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कात्रजमध्ये कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज येथील नवीन उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या थांबलेल्या एका तरुणाची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल पावणेसहा कोटी रुपये किमतीचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आले. पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जैन समाज पुन्हा धावला!

युवक महासंघाकडून वाईतील जांभली आणि पांड्या गावांसाठी जीवनावश्यक साहित्य रवाना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संकटाच्या काळात समाजासाठी धावून जाण्याची परंपरा जपणाऱ्या श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ, पुणे यांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जांभली आणि पांड्या या गावांतील पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा किराणा … Read more

स्वानंद महिला संस्था, पुणे व गेलडा परिवाराचा वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीच्या पावन निमित्ताने स्वानंद महिला संस्था, पुणे यांच्या पुढाकाराने तसेच गेलडा परिवार आणि ज्योती भटेवरा यांच्या सहकार्याने वारकरी दिंडींसाठी ७५१ स्टीलच्या ताटांचे वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचा लाभ शेकडो वारकऱ्यांना झाला. वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होत समाजाप्रती आपली बांधिलकी जपत हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. … Read more

आषाढी वारीपूर्वी बार्शी तालुक्यात पोलीसांचा गुन्हेगारांवर धडाका

रेकॉर्डवरील ५३ सराईत आरोपींवर प्रतिबंधक कारवाई : सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : आगामी आषाढी वारी तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी तालुका पोलीस स्टेशनकडून रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीणचे … Read more

फ्लॅटमध्ये चूल पेटवल्याने आग

धनकवडीतील घटनेत स्वतःच्या फ्लॅटसह शेजारच्या फ्लॅटला झळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटमध्ये चूल पेटवत असताना सोसायटीतील रहिवाशांनी वारंवार समजावूनही संबंधिताने त्याकडे दुर्लक्ष केले. चूल पेटवल्यानंतर आगीचा भडका उडून फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारील आणि वरच्या मजल्यावरील फ्लॅटलाही आगीची झळ बसून मोठे नुकसान झाले. ही घटना धनकवडीतील राज टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी … Read more

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

इयत्ता पाचवी व आठवी मिळून १७५ विद्यार्थी पात्र : ४४ विद्यार्थ्यांनी मिळवली शिष्यवृत्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५–२६ च्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील ७९ विद्यार्थी पात्र ठरले … Read more

आनंद दरबारच्या प्रांगणात वारकऱ्यांची मांदियाळी

विठ्ठल नामाच्या गजराने दत्तनगर परिसर दुमदुमला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांचे पुण्यातील विविध भागांत मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर दत्तनगर-आंबेगाव येथील आनंद दरबारमध्ये वारकरी दिंड्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. “साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा” … Read more

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

आंबेगाव, येवलेवाडीतील घटना : सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची १३ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी आंबेगाव आणि येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी सायबर चोरट्यांनी मोबाईलवरून संपर्क … Read more

सूर्यदत्त हॉस्पिटॅलिटी कॉलेजची उत्कृष्ट दर्जाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व प्लेसमेंट

देश-विदेशातील आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी ब्रँड्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) ने यंदाही १०० टक्के राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचा मानाचा टप्पा गाठला आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित हॉस्पिटॅलिटी … Read more

मोशीत भीषण दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला

23 जण अडकल्याची शक्यता, 14 जणांची सुटका, 9 जणांचा शोध सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. अनेक वर्षांपासून साचलेल्या ‘लेगसी वेस्ट’च्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग मुसळधार पावसामुळे अचानक घसरला आणि अवघ्या काही क्षणांत तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेच्या … Read more