आवृत्ती , पुणे

मुलींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना : तरुणीवर मॉरल पोलिसिंगचा प्रकार, तरुणींचे आंदोलन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरून मॉरल पोलिसिंग करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी गुन्हा दाखल … Read more

दारूच्या नशेत कुत्र्याला चौथ्या मजल्यावरून फेकले

कुत्र्याचा पाय, पाठीचा कणा मोडला : भवानी पेठेतील घटना, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पामेरियन कुत्र्याला थेट चौथ्या मजल्यावरून खाली पत्र्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये कुत्र्याचा पाय आणि पाठीचा कणा मोडला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडक पोलिसांनी या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. … Read more

खंडणी उकळणारा पोलीस अंमलदार निलंबित

गुटखा विक्रेत्याकडून घेतली होती १ लाख ६५ हजारांची खंडणी : पोलीस उपायुक्तांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी परिसरातील गुटखा विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस अंमलदार रामकिशन धोंडिबा हंबर्डे … Read more

पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात

गुरुवारपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद : पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून (दि. १५ ऑक्टोबर २०२६) पुणे शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या … Read more

‘गोपी’ साबणाच्या नावाखाली बनावट साबणांची विक्री

पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची कारवाई : ३.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नामांकित ‘गोपी’ साबणाच्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा कथित गैरवापर करून बनावट साबणांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये या प्रकरणात ३ लाख ५३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुण्यातील … Read more

२ किलो सोने चोरणारे काका पुतणे गजाआड

खडक पोलिसांची कामगिरी : सव्वा दोन कोटींचा ऐवज जप्त, १२ तासात गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिराचे घर बंद असताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे २ किलो २०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे चोरून नेली होती. खडक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही … Read more

टाइल्स व सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी घनश्याम गोहिल

पुण्यात वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : २०२६-२८ साठी नवीन कार्यकारिणीची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. पुणे : टाइल्स व सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशन, पुणेची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ४ ऑक्टोबर रोजी कोंढवा बुद्रुक येथील श्री पूना गुजराती बंधु समाजाच्या जयराज कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये उत्साहात पार पडली. या सभेला १०० हून अधिक सदस्य उपस्थित होते. सभेत असोसिएशनच्या मागील कार्यकाळातील … Read more

बँकेचे कर्ज न फेडता २५ लाखांची फसवणूक

हायवा ट्रक घेतला विकत : फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हायवा ट्रक विकत घेताना त्यावरील २२ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. मात्र, हे कर्ज न फेडता हायवा ट्रक परस्पर दुसऱ्याला विकून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गजेंद्र … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

‘शापित’, ‘एक होता विदूषक’ ते ‘झपाटलेला’ : येरवड्यात होणार अंत्यसंस्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील शास्त्रीनगर, येरवडा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एका अष्टपैलू कलावंताचा प्रवास थांबला … Read more