आवृत्ती , पुणे

पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांनी न्यायव्यवस्थेचे प्रत्यक्ष स्वरूप समजून घ्यावे

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “कायदा हा केवळ न्यायालयीन कामकाजापुरता किंवा कायद्याच्या पुस्तकांपुरता मर्यादित नसून, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मालमत्तेचे व्यवहार, ग्राहकांचे हक्क, वाहतुकीचे नियम, कौटुंबिक संबंध आणि मूलभूत अधिकार अशा अनेक बाबींमध्ये कायद्याचे … Read more

सूर्यदत्तमध्ये ‘नवरंग गरबा’चा जल्लोष, नृत्याच्या तालावर थिरकला बावधन कॅम्पस

गरबा-दांडियात विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : नऊ पुरस्कारांतून कलागुणांचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित ‘सूर्यदत्त नवरंग गरबा’ या सांस्कृतिक सोहळ्यात पारंपरिक संस्कृती, संगीत, नृत्य आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, गरब्याच्या तालावर थिरकणारी पावले आणि दांडियाचा निनाद यामुळे संपूर्ण कॅम्पस उत्सवमय झाला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर … Read more

लाच घेताना वन विभागाचा वनपाल जाळ्यात

पावसात जमीन गेली होती वाहुन : नदीतील मातीचा भराव शेतात टाकण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पावसाळ्यात शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली होती. त्यामुळे शेतकरी नदीपात्रातील माती शेतात टाकत असताना वनपालाने त्याला मज्जाव करून कारवाईची भीती दाखवली. त्यानंतर लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपालाला रंगेहाथ पकडले. जहीर सिराज शेख (वय ४७, … Read more

विजयकांत कोठारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विजयकांत कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघ, जीतो (JITO), जय आनंद ग्रुप तसेच महावीर प्रतिष्ठान या विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयकांत कोठारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी … Read more

४५० दृष्टिबाधितांना दिवाळी शिध्याचे वाटप

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० दृष्टिबाधित व्यक्तींना दिवाळीनिमित्त शिध्याचे वाटप करण्यात आले. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता येथील द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या शिर्डी साईबाबा … Read more

विश्वसंत पुष्करमुनीजी म. सा. यांची ११७ वी जन्मजयंती उत्साहात साजरी

सामाजिक कार्याचा गौरव : पुष्कर धामचे अध्यक्ष अशोक सालेचा यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प. पू. विश्वसंत श्री पुष्करमुनीजी म. सा. यांची ११७ वी जन्मजयंती कोंढवा येथील श्री गुरू पुष्कर साधना केंद्र (पुष्कर धाम) येथे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) अत्यंत उत्साहपूर्ण, श्रद्धामय आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संतांचे पावन सान्निध्य, … Read more

श्वानप्रेमी सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खाण्यास देण्यावरून भांडण : मुंढव्यातील केशवनगरमधील घटना, एकाला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांना बोलावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची तक्रार देऊन परत येत असलेल्या श्वानप्रेमी तरुणाच्या डोक्यात दोघांनी लोखंडी हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुंढवा पोलिसांनी एकाला अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चेतन दिलीप … Read more

‘शी टेल्स’मधून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रेरणादायी कथा

हर वर्ड इंडिया व अर्हम फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम : विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी मांडले अनुभव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय प्रवासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हर वर्ड इंडिया आणि अर्हम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शी टेल्स : महिलांच्या सक्षमीकरणाच्या कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. या कार्यक्रमात … Read more

एल अ‍ॅन्ड टी कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी : तळजाई येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याबद्दल एल अ‍ॅन्ड टी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव … Read more