HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
डी. एस. कुलकर्णी यांच्या जप्त कार स्वस्तात देण्याचे आमिष : एजंटने अनेकांना घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्या सोडवून स्वस्त दरात विक्री करण्याचे आमिष दाखवून कार खरेदी-विक्री करणाऱ्या एका एजंटने अनेकांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोहसीन मोहम्मद मुल्ला … Read more
बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचा निर्णय; १५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिक अशोक जैन यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कथित आर्थिक फसवणूक, मृताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेता आरोपींना जामीन मंजूर करता येणार नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश … Read more
दुबई व थायलंडमधून चालवत होता आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत २०२४ पासून वॉन्टेड असलेल्या आणि दुबई व थायलंडमधून आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट चालविणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला बँकॉक येथे अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी भारतात आणले आहे. सौरभ ऊर्फ गणेश बाळासो काळे … Read more
राज्यातील ४० हून अधिक पालकांना घातला गंडा : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ४० हून अधिक पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालविणाऱ्या तेलंगणातील एका संस्थाचालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, … Read more
बांधकाम पाडण्याची भीती दाखवून मागितली ७० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उच्च न्यायालयाने दंड भरून बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिलेले असतानाही बांधकाम पाडण्याची भीती दाखवून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. शिवराजनगर, … Read more
हडपसर, फुरसुंगीमधील ५ ठिकाणी कारवाई : दररोज शेकडोंची होत होती फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर व फुरसुंगी येथे बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर मुंढवा पोलिसांनी हडपसर व सायबर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कॉल सेंटर उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवून लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून … Read more
डेक्कन पोलिसांची कामगिरी : गुंडावर खंडणीसह ५ गंभीर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून नदीपात्रात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला डेक्कन पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या अजयसिंग दुधानीकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने तिघांना जेरबंद केले. तर तिघेजण पसार झाले. गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या सराईत गुन्हेगार अजयसिंग दुधानी याच्याकडून एक … Read more