आवृत्ती , पुणे

व्यवसायासाठी पर्सनल लोन काढायला सांगून तरुणीची फसवणूक

पैसे मागितल्यावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी : जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिअर शॉपीचा व्यवसाय करण्यासाठी प्रियकराने तरुणीला १८ लाखांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले. त्यानंतर तिने पैसे परत मागितल्यावर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत केशवनगरमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात … Read more

इंडिगोच्या गुवाहाटी विमानात ‘BOMB’ लिहिलेली चिठ्ठी सापडली

पुणे विमानतळावरील घटना : खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या प्रसाधनगृहात ‘BOMB’ (बॉम्ब) असे लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर संपूर्ण विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

विषारी दारू प्रकरणात हडपसरचे ३ पोलीस अधिकारी निलंबित

दापोडीचे ६ पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारू पिऊन १९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत हातभट्टी दारूची विक्री झालेल्या हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तिघांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस ठाण्यातील … Read more

दारूच्या वासाच्या जागी दरवळणार सुगंधी अगरबत्तीचा सुगंध

दारू गाळणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांचे आश्वासक पाऊल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हातभट्टीची विषारी दारू पिल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात अनेकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर, पिढ्यानपिढ्या दारू गाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना गृहउद्योगाच्या माध्यमातून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी एक आश्वासक पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने आयोजित महिला मेळाव्यात अगरबत्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक … Read more

“महावीर की रोटी” सेवा उपक्रम बना जरूरतमंदों का सहारा

पिंपले सौदागर जैन समाज द्वारा हर रविवार 120 से अधिक लोगों को कराया जाता है सात्विक भोजन महाराष्ट्र जैन वार्ता पिंपले सौदागर : पिंपले सौदागर स्थित श्री वर्धमान जैन श्रावक संघ की ओर से “महावीर की रोटी” नामक सेवा उपक्रम पिछले साढ़े तीन वर्षों से निरंतर संचालित किया जा रहा है। इस सेवा के माध्यम … Read more

रिक्षाचालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीमुळे मानसिक त्रास : विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने रिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घोरपडी पेठेत घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका विवाहित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश … Read more

जनगणनेसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग : मुलालाही मारहाण

जनगणना कामात अडथळा, दगडाने हल्ला : ५ जणांसह अन्य साथीदारांवर गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच संबंधित महिलेच्या मुलालाही हाताने व दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा … Read more

पुण्यात ४०० कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होणार

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले … Read more

फुगेवाडीपाठोपाठ पुण्यात विषारी दारूचे ५ बळी

हडपसरच्या मंत्री मार्केटमधील अवैध दारू अड्ड्याचा संशय; फुगेवाडीत आधीच १३ जणांचा मृत्यू महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुगेवाडी येथे विषारी दारू पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्याच प्रकरणाचे लोण पुणे शहरातही पसरल्याचे समोर आले आहे. हडपसर परिसरातील आणखी ५ जणांचा विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात … Read more