आवृत्ती पुणे

कोरोना झाल्याचे भासवून खून केल्याची तक्रार

हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची लागण झाल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा खून केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी (दि. २६) हडपसर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलिसाचाही समावेश आहे. जमीन लाटण्याच्या कारणातून … Read more

सशस्त्र सेनेतील जवानांसाठी रक्तदान शिबीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सशस्त्र सेनेतील जवान आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ९० रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. … Read more

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव

त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध: उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्षपदी एन.एन.जगदाळे,सचिव पदी पी.टी.पाटील, सहसचिव पदी ए.पी.देबडवार व खजिनदार पदी जे.सी.शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी १७ – अर्ज दाखल झाल्याने सर्व संचालकांची … Read more

दुचाकीवरील चोरट्यांनी मोबाईल हिसकावला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटला जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पायी जाणाऱ्या युवकाचा मोबाईल हिसकावल्याचा प्रकार गंगाधाम परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी २१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. फिर्यादी युवक २६ जून रोजी मध्यरात्री गंगाधाम चौकातून जात असतांना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. पोलिसांनी तातडीने हालचाली … Read more

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १६ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोथरूड मधील एका महिलेची १६ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी ५१ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६ मे ते ६ जून या महिन्याभरात हा प्रकार घडला आहे. राहत्या घरी … Read more

परराज्यातील मोबाईल चोरट्यास कात्रजला अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परराज्यातील मोबाईल चोरटयास अटक करुन त्याच्याकडुन ४ मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडुन एकुण ७५,००० रुपयांचे चार मोबईल फोन जप्त करण्यात आले असुन आरोपी गणेशकुमार गोंगा महतो यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२१ जुन रोजी भारती विद्यापीठ पोलीस तपास पथकाचे … Read more

पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची राहणार नजर

वारकऱ्यांच्या वेशात पोलीस सहभागी होणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्रीक्षेत्र देहू येथून जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २८) प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. २९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि. ३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होतील. पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची नजर … Read more

ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरणारा नोकर पकडला

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दत्तनगर आंबेगाव येथील सोनाराच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यास अटक करुन त्यांच्या कडुन ५ लाख रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१६ जुन रोजी दत्तनगर जांभुळवाडी रोड, गवळी वाडा, आंबेगाव खुर्द येथील सुमा आकांक्षा ज्वेलर्स … Read more

येरवडा कारागृहात कैद्याला तिघांकडून मारहाण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा … Read more

एल.आय.सी. कडून पॉलिसीधारकांना सावधानतेच्या सूचना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काही कंपन्या पॉलिसी सरेंडर करण्याच्या नावाखाली एल. आय. सी. पॉलिसी होल्डर्सकडून पॉलिसी मिळवू पाहात आहेत. या प्रकरणात एलआयसीने स्पष्ट केले की त्यांच्या या ऑफर अधिकृत नाहीत. या प्रकरणानंतर एलआयसीने सावधानतेच्या सूचना जारी केल्या आहेत. देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. या सर्व ग्राहकांच्या हितासाठी एल.आय.सी. ने एक महत्वाची सूचना … Read more