आवृत्ती , पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायी चालत वारीत सहभाग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवाडी दरम्यान वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या – … Read more

शांतीनगर येथे महिलेची सोनसाखळी हिसकावली

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील पदपथावर चालत असतांना सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार नेमीच घडतात. गर्दीतील चोरटे पळून जातात. आता हे प्रकार पुण्यालगतच्या उपनगर परिसरात ही वाढू लागले आहेत. या प्रकरणी शांतीनगर सोसायटी, कोंढवा येथील ३१ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी महिला ५ जुलै रोजी बाळासाहेब देवरस हॉस्पीटलसमोर … Read more

कात्रज बसस्थानकावर मोबाईल चोरटे पकडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नेहमीच गजबजलेल्या कात्रज येथील पी.म. पी. बस स्थानकावर गर्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापिठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कात्रजच्या बसस्टाॅप वर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. बसमध्ये चढताना मोबाईल चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. कात्रज मधीलच एका तरुणाने ५ जुलै रोजी सकाळी त्याचा … Read more

कारागृहातील महिला बंद्यासाठी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता व कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा स्वाती साठे यांच्या आदेशान्वये येरवडा महिला खुले कारागृह, पुणे येथे केंद्रिय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामउद्योग आयोग यांचे मार्फत महिला बंद्यासाठी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. येरवडा महिला खुल्या कारागृहातील शेती … Read more

वडगाव धायरीत चातुर्मासनिमित्त जैन संताचे प्रवेश मोठ्या उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या कृपाशीर्वादाने प. पू. श्री रिध्दीमाजी म. सा. यांची सुशिष्या ज्ञान आरोही प. पु. श्री संबोधीजी म. सा., प. पु. श्री संस्कृतीजी म.सा., प. पु. श्री संयतीजी म. सा. आदि ठाणा ३ यांचा मंगलमय चातुर्मास प्रवेश वडगाव धायरी येथील श्री संघ सुवासीनी मंगल … Read more

शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायामध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनने दिनेश पुखराज रेनवा (वय २८, रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार नामदेव कापसे यांनी … Read more

महिलेला धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महिलेला लग्नाचे आमिषदाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तु पोलिसात गेली तरी मला काही फरक पडत नाही, असे म्हणून महिलेला धमकी दिल्याने कोंढवा पोलिसांनी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत खडकवासला व कोंढवा येथील निर्जन रस्त्यावर कारमध्ये घडला आहे.याबाबत ३५ … Read more

महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारवाईस विरोध करताना मद्यपी वाहन चालकाने महिला पोलीस अधिकारी व एका पोलीसावरच पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. फरासखाना पोलीस ठाण्यात ही खळबळजनक घटना ५ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार समीर सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून, संजय फकिरबा साळवे, (वय ३२, सध्या राहणार. पिंपरी चिंचवड … Read more

फुलगावात जुगार अड्यावर छापा, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी तुळापुर रस्त्यावरील हॉटेलवर छापा टाकून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०२ जुलै रोजी तुळापुर रोडवरील, हॉटेल शेतजत्रा या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने छापा टाकला … Read more

फुरसुंगीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना केली अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संकेत विहार, फुरसुंगी येथे वाहनाची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ४ जुलै रोजी संकेत विहार, मेन रोड फुरसुंगी हडपसर पुणे येथे ४ ते ५ इसमांनी त्यांच्या हातातील लोखंडी शस्त्रांनी वाहनांच्या काचा तोडुन नुकसान करून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी गुन्हा … Read more