आवृत्ती , पुणे

अवघ्या दोन तासांत हरवलेले मंगळसूत्र परत

सव्वा लाख रुपयांचा दागिना : सहकारनगर पोलिसांच्या सतर्कतेपणाचे कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडी परिसरात हरवलेले मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधून देण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले. धनकवडी येथील प्राची महेश कांबळे यांचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हरवले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी … Read more

पिस्टल बाळगून दहशत माजवणार्याच्या आवळल्या मुसक्या

युनिट सहाची कामगिरी : मयूर गायकवाड व ओंकार नाळे पोलीसांच्या जाळ्यात महाराष्ट्र 360 न्युज पुणे : दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल व जिवंत काडतुसं जवळ बाळगणा-या सराईतांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले. दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व काडतुस बरोबर बाळगणा-या मनोज साळवे टोळीतील मयुर गायकवाड व ओंकार नाळे हे सुयोगनगर ४ … Read more

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more

खुनाची सुपारी घेणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात

वेळीच ताब्यात घेतल्याने वाचले एकाचे प्राण : जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोघांचे कृत्य पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क येरवडा जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोन आरोपींनी एकाच्या खुनाची सुपारी घेतली. मात्र खून करण्याआधीच कोंढवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने एकाचे प्राण वाचले आहेत. आरोपींकडून तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत … Read more

गुजरवाडीतील बैलगाडी शर्यतप्रकरणी
बारा आरोपींना केले गजाआड

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : बंदीच्या आदेशाचा भंग करून शर्यतीचे आयोजन पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा भंग करून गुजरवाडीत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा जणांना गजाआड केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही पुणे शहरातील गुजरवाडीत, उच्च न्यायालयासह राज्य सरकारने … Read more

बिबवेवाडी पोलिस स्टेशनला कलर प्रिंटर भेट

पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क नगरसेविका रूपाली दिनेश धाडवे यांच्या प्रयत्नातून बिबवेवाडी पोलिस स्टेशनला शुक्रवारी (16 जुलै रोजी) कलर प्रिंटर भेट देण्यात आला. या वेळी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह नगरसेवक दिनेश धाडवे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झांवरे आणि पोलिस कर्मचारी सोराटे, रूकवते आदी उपस्थित होते.

तीन लाख रुपयांचा गुटखा कारसह पकडला

भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांची कामगिरी : दोघे भाऊ ताब्यात पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क एका कारसह सुमारे तीन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा पकडण्यात भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांना यश आले आहे. पोलीस नाईक विशाल वसंतराव खटावकर यांनी वडगाव-कात्रज बायपास रोडवर कारसह हा माल जप्त केला असून, याप्रकरणी दोघा भावांना ताब्यात घेतले आहे. … Read more

खुनाच्या प्रयत्नातील फरारी आरोपीस अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सहा महिन्यांपासून देत होता गुंगारा पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खुनाच्या प्रयत्नाचा आरोप असलेला आणि गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यास बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींपैकी दोघे आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. मंग्या उर्फ मंगेश अनिल माने (वय 24, रा. अप्पर … Read more

दोघा सराईत वाहनचोरांस अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मोबाईलची आणि दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या दोघा सराईत चोरट्यांना पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल संच आणि चार दुचाकी असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरलेली एक दुचाकी धनकवडी स्मशानभूमीच्या पाठीमागे विकण्यासाठी आले असताना … Read more

मारहाण करणार्‍या तिघांना अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : लोखंडी सिखंजा, बांबू आणि रॉडने मारहाण पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मारहाण करून पलायन केलेल्या तिघा आरोपींना अटक करण्यास भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून, सदर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सदर आरोपींनी लोखंडी सिखंजा, बांबू आणि रॉडने दोघांना मारहाण केली … Read more