सव्वा लाख रुपयांचा दागिना : सहकारनगर पोलिसांच्या सतर्कतेपणाचे कौतुक
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : धनकवडी परिसरात हरवलेले मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधून देण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले.
धनकवडी येथील प्राची महेश कांबळे यांचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हरवले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी तत्काळ तपास पथक नेमून पोलीस उपनिरीक्षक सुधिर घाडगे, पोलीस अंमलदार प्रदिप बेडीस्कर, शिवलाल शिंदे व सागर शिंदे यांना मंगळसूत्र शोधण्याचे आदेश दिले होते. तपास पथकाने धनकवडी परीसरात पाहणी करून अवघ्या दोन तासात गहाळ झालेले मंगळसुत्र शोधून प्राची कांबळे यांना परत केले.