कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी संवाद साधून महाराष्ट्र पोलीस तसेच पुणे शहर पोलीस दलाने कोरोना (कोविड 19) या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या अतूट प्रयत्नाबद्दल प्रशंसा केली. “सर्व नागरिक घरात असताना कोरोना संकटात स्वतःच्या कुटुंबीयांचा कोणताही विचार न करता 24 तास रोडवर उभे राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी केले आहे. जनतेस येणार्या सर्व संकटाच्या वेळी मदतीस धावून येणारा प्रथम नागरिक म्हणजे पोलीस,” अशा शब्दांत त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
या वेळी डेक्कन पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांचे आणि त्यांचे इतर सहकारी यांचे आभार मानले. या वेळी पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले आणि इतर अधिकारी अंमलदार हजर होते.
