युनिट सहाची कामगिरी : मयूर गायकवाड व ओंकार नाळे पोलीसांच्या जाळ्यात
महाराष्ट्र 360 न्युज
पुणे : दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल व जिवंत काडतुसं जवळ बाळगणा-या सराईतांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले.
दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व काडतुस बरोबर बाळगणा-या मनोज साळवे टोळीतील मयुर गायकवाड व ओंकार नाळे हे सुयोगनगर ४ नंबर, भावडी वाघोली येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्टल आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या हद्दीमध्ये पोलिस गस्त घालत असताना पोलिस नाईक नितीन मुंढे व नितीन शिंदे यांना त्यांच्या बातमीदारार्फत माहिती मिळाली होती. ती माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलिस निरिक्षक गणेश माने यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागत पथकासह सापळा रचून इसम मयुर भाऊसाहेब गायकवाड (वय २५, रा. सी. एन. जी पंपाजवळ चिखली, जाधववाडी, पुणे) व ओंकार ऊर्फ विकी प्रकाश नाळे (वय २८, रा. व्दारका विश्व सोसा, बिल्डींग, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) यांना ताब्यात घेतले. तपासाअंती दोन्ही इसम हे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या रेकार्डवरचे गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आले.
सर्व सामान्यांमध्ये दशहत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिवत काडतुस बाळगले असल्याचे कबुल केले. या आरोपींविरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात शस्त्रं बाळगून दहशत माजविल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
