आवृत्ती पुणे

बार्शीत मतदान फक्त 63.36% वर : यंदा सहभागात मोठी घट

प्रभाग ६ मध्ये बोगस मतदानाचा आरोप : एका केंद्रावार ईव्हीएम अर्धा तास ठप्प महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवारी (दि. २) झालेल्या मतदानात यंदा तुलनेने घट झाली. शहरातील 112 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडलेल्या मतदानात 63.36 टक्के मतदान नोंदवले गेले. … Read more

चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी ५ गुन्हे आणले उघडकीस : दुचाकीसह ४ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरून त्याचाच वापर करून महिला व पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ५ गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे दागिने व दुचाकी असा ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल … Read more

नशेसाठी वापरल्या जात आहेत गुंगीकारक औषधी गोळ्या

खडक पोलिसांनी दोघांना पकडून जप्त केल्या ६९०० गोळ्या : उत्तर प्रदेशातून कुरिअरने मागवल्या जात होत्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नशेसाठी गुंगीकारक औषधी गोळ्या विकल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. उत्तर प्रदेशातून कुरिअरद्वारे या गोळ्या पुण्यात मागवून त्यांची नशेसाठी विक्री करणार्‍या दोघांना खडक पोलिसांनी पकडले. त्यांच्या स्कुटरच्या डिकीमधून आणि घरातून तब्बल ६ हजार ९०० … Read more

प्रियकराने प्रेयसीचा खुन करुन केली आत्महत्या

रुबी हॉल क्लिनिकमधील दोघेही लॅब टेक्निशियन : दुसऱ्यासोबत विवाह ठरल्याने केले कृत्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामाच्या ठिकाणी प्रेम जुळले, पण समाजभेदामुळे नातेसंबंधाला विरोध. विवाह दुसऱ्यासोबत ठरल्याने प्रियकराने प्रेयसीचा गुदमरवून खून केला आणि स्वतःही रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात उघड झाली आहे. दोघेही रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. … Read more

महारेराचा ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर ला दणका

वास्तू इम्पीरियल विंग A मधील २९ गृहखरेदीदारांना दिलासा : व्याजासह परतावा देण्याचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२४ मध्ये बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन दिले असतानाही वर्ष होत आले, तरी बांधकाम पूर्ण न करणाऱ्या ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला महारेराने दणका दिला आहे. गृहखरेदीदारांना विलंब व्याजासह ताबा देण्याचे तसेच लागू असल्यास व्याजासह … Read more

अंमली पदार्थ तस्कराकडून ११ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाघोलीमध्ये राजस्थानी गुन्हेगारावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या एका राजस्थानी तस्कराला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७, रा. केसनंद-वाघोली रोड, चिरायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागे, वाघोली) असे या … Read more