आवृत्ती , पुणे

पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर हॉटेल कपिला जवळ स्लॅब कोसळला; दोघे अडकल्याने अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी..

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मारहाणीत महिलेचा मृत्यु झाल्यानंतरही मृतदेह ठेवला होता घरातच

नंतर कचर्‍यात मृतदेह टाकून देणार्‍या बापलेकाला अटक : विमानतळ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा येथील नवी खडकी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सुवर्णा (वय ४०) हिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरातच ठेवून २–३ दिवसानंतर दुर्गंधी पसरू लागल्यावर आरोपीने रात्री रिक्षातून मृतदेह लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील कचराकुंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. … Read more

सातार्‍यात खंडणी मागून दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगाराला पुण्यात अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई : महिलेचा विनयभंग केल्याचाही गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा शहरातील यडाई देवी मंदिराजवळ एका तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून खंडणी मागून जखमी करून खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी एकाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुण्यात जेरबंद केले आहे. निखील अशोक काळे (वय २२, … Read more

पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर होणार बंद

कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या आठवड्याभरात पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाणीच्या तीन घटना घडल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भैरोबा नाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपांवरील … Read more

सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर

फ्लॅटसह एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लॅटसह तेथील ‘रूट २४’ हॉटेलमधील हुक्का पार्लरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके (वय २७, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, … Read more