आवृत्ती पुणे

कात्रज उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन

योगेश टिळेकर यांचा पाठपुरावा : कात्रजमधील वाहतूक कोंडी सुटण्यास होईल मदत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज चौकातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी वंडर सिटी ते राजस सोसायटी सहापदरीउड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, … Read more

सराईत वाहनचोर स्वामीला अटक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कारवाई : चार दुचाकी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील विविध भागातील दुचाकी हेरून चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश दत्तात्रय स्वामी (वय २९ रा. भोरेश्वरनगर, पिराचामाळा, भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र शांताराम साळुंखे (वय ४९) यांनी … Read more

दहशत माजविण्यासाठी येरवड्यात टोळक्याचा राडा

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : 14 वाहनांची तोडफोड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दहशत माजविण्यासाठी हातात तलवार, रॉड आणि कोयते घेउन आलेल्या टोळक्याने येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये १४ वाहनांची तोडफोड केली. ही घटना २२ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास घडली. त्यानंतर टोळके दुचाकीवरून पसार झाले. तोडफोडीत प्रत्येकी दोन रिक्षा आणि मोटारींसह १० दुचाकींचे नुकसान झाले आहे. … Read more

अंड्यासहित टेम्पो चोरणारा सराईत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-५ ची कारवाई : लाखो रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून अंड्यासहित टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीकडून एक घरफोडी आणि तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जावेद खान (वय ३८, रा. स.नं.४२, फैजानी मदिना मजिदसमोर, सुभानाल्ला बिल्डिंग, कोंढवा) असे अटक केलेल्याचे … Read more

दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद

दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त : खंडणी विरोधी पथकाची बावधन येथे कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, … Read more

दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

चाकण, देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर आणि अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चाकण आणि देहूरोड परिसरात दोन भीषण अपघात झाले. या दोन्ही घटनांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 22) चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात अनिल फकिरा खंडारे (वय २७, रा. निघोजे, … Read more

घरफोडी करणारी परप्रांतीय मोलकरीण जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : तमिळनाडूत जाऊन साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटी व कॉलनीमध्ये मोलकरणीचे कामकाज मिळवून घरातील सदस्यांना गुंगीकारक द्रव्य पाजून घरफोडी करणाऱ्या तमिळनाडूच्या सराईत महिलेस वानवडी पोलिसांनी तमिळनाडूत जाऊन अटक केले असून, एकूण अकरा गुन्ह्यांतील साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील … Read more

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पिस्तुलासह अटकेत

युनिट चारची कामगिरी : गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अतिक शेखला पिस्तुलासह अटक करण्यात युनिट चारला यश मिळाले असून, सदर आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी (२२ सप्टेंबर) गुन्हेगार … Read more

वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणारा जेरबंद

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोड पानमळा वसाहतीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पानमळा येथील वीजबिल थकल्याने वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्यास अटक केली. थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी गेले होते. त्यावेळी गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल गायकवाड … Read more

मोटारसायकल चोरणारे दोन सराईत जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशनची कामगिरी : तीन लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व सूत्रांच्या माहितीच्या आधारे दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ मोटारसायकली सुमारे तीन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. दीपक परदेशी (वय २६, रा. रामटेकडी, हडपसर), विशाल ऊर्फ … Read more